Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजपानं 'करेक्ट' फासे टाकले; काँग्रेसला 'असं' खिंडीत गाठलं, समजून घ्या गणित!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:04 AM2022-06-02T09:04:43+5:302022-06-02T09:07:21+5:30
Rajya Sabha Election: देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Rajya Sabha Election: देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. या ४ राज्यांमध्ये जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त भाजपनं प्रत्येकी एक उमेदवार उभा करून आणि पाठिंबा देऊन काँग्रेसच्या अडचणीत वाढ केली आहे.
चार राज्यांत भाजपानं विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पक्षानं चार केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजप नेतृत्वानं राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, हरियाणात गजेंद्रसिंह शेखावत, जी. किशन रेड्डी आणि अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्रातील निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
हरयाणातील दोन जागांवर तीन उमेदवारांमध्ये स्पर्धा
हरयाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार असून तीन उमेदवारांमध्ये लढत आहे. येथे बहुमताचा आकडा ३१ असा आहे. विधानसभेत भाजपाचे ४१ आमदार आहेत. अशा स्थितीत भाजपाचे उमेदवार कृष्णलाल पनवार सहज विजयी होऊ शकतात. त्याचवेळी काँग्रेसकडे ३१ आमदार असून त्यांचे उमेदवार अजय माकन यांचाही विजय होण्याची शक्यता आहे. पण एकही मत इकडे-तिकडे गेलं, तर भाजपा-जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांच्यासोबत कडवी लढत होईल.
कार्तिकेय शर्मा हे काँग्रेसचे माजी नेते विनोद शर्मा यांचे पुत्र आणि हरयाणाचे माजी सभापती कुलदीप शर्मा यांचे जावई आहेत. पक्षाचे सर्व १० आमदार कार्तिकेय शर्मा यांना पाठिंबा देतील, असं जजपाचे नेते अजय सिंह चौटाला म्हणाले आहेत.
राजस्थानबद्दल बोलायचं झालं तर विधानसभेच्या २०० जागा आहेत आणि कोणत्याही उमेदवाराला राज्यसभेत पोहोचण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. राज्यात काँग्रेसचे १०८ तर भाजपचे ७१ आमदार आहेत. काँग्रेस चारपैकी दोन तर भाजपला एक जागा जिंकता आली आहे. येथे चौथ्या उमेदवारासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे.
कर्नाटकात रोमांचक लढत
कर्नाटकात कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता असते. येथे भाजपचे १२२ आमदार आहेत. त्यात तीन उमेदवार रिंगणात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेता जगेश यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्याकडे ३२ मतं शिल्लक राहतील, जी तिसरे उमेदवार लहरसिंग यांना जातील. विजयासाठी आणखी १३ मतांची गरज लागेल. त्याचवेळी काँग्रेसकडे ७० आमदार असून एक उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे २५ मतं शिल्लक राहतील. दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी त्याच्याकडे २० मतं असणं आवश्यक बनलं आहे.
महाराष्ट्राच्या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. येथून ६ उमेदवार राज्यसभेत पोहोचतील. त्यांना ४२ मतांची गरज आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, ज्येष्ठ नेते अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे स्वबळावर दोन जागा जिंकण्याइतकी मतं आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे एक उमेदवार स्वतंत्रपणे निवडून आणण्यासाठी मतं आहेत, परंतु ते एकाच वेळी संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी आणि एक उमेदवार निवडून आणू शकतात.
महाविकास आघाडीकडून चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार विजयी करू शकतात, परंतु शिवसेनेच्या दोनपैकी एकाचाच विजय निश्चित मानला जात आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला आणखी ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिवसेनेला आणखी ३० आमदारांची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उर्वरित आमदारांकडूनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही.