Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 03:44 PM2022-06-11T15:44:47+5:302022-06-11T15:46:10+5:30

Rajya Sabha Election Result 2022: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता.

Rajya Sabha Election Result 2022 bharatiya janata party bjp loses four seats in rajya sabha will have to wait to reach 100 | Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान, आता भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा

googlenewsNext

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये, म्हणजेच राज्यसभेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सदस्य संख्या 100 वर पोहोचली होती. मात्र, राज्यसभेच्या 57 जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीनंतर, ती कमी झाली आहे. राज्यसभेतील भाजपची सदस्य संख्या आता 95 वरून 91 वर आली आहे.

100 पर्यंत पोहोचण्यासाठी पाहावी लागेल वाट -
राज्यसभेच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, निवृत्त होत असलेल्या 57 सदस्यांसह राज्यसभेच्या एकूण 232 सदस्यांमध्ये भाजपचे 95 सदस्य आहेत. निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या एकूण 26 सदस्यांचा समावेश आहे. तर या निवडणुकीत भाजपचे 22 सदस्य निवडून आले आहेत. अशा प्रकारे भाजपला एकूण 4 जागांचे नुकसान झाले आहे. नुवडून आलेल्या सदस्यांच्या शपथविधीनंतर, भाजपच्या एकूण सदस्यांची संख्या 95 वरून 91 वर येईल. म्हणजेच पुन्हा एकदा 100 च्या जवळपास पोहोचण्यासाठी अथवा शंभरचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी वाट पाहावी लागणार आहे.

अद्यापही 13 जागा रिक्त - 
राज्यसभेतील सात नामनिर्देशित सदस्यांसह एकूण 13 जागा अद्यापही रिक्त आहेत. नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीनंतर आणि रिक्त जागा भरल्यानंतर, भाजपची सदस्य संख्या 100 च्या जवळपास पोहोचू शकते. कारण, काही अपवाद वगळता, नामनिर्देशित सदस्य सर्वसाधारणपणे त्यांच्या नामांकनानंतर सहा महिन्यांच्या आत स्वतःला एखाद्या पक्षाशी (शक्यतो सत्ताधारी पक्ष) जोडून घेतात.

एप्रिल महिन्यात गाठला होता 100 चा आकडा -
गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही भाजपची मोठी अचिव्हमेंट असल्याचे म्हटले होते.

राज्यसभेच्या 57 जागांसाठी झाले मतदान - 
राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, मागच्या शुक्रवारी उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्वचे सर्व 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यात भाजपच्या 14 उमेदवारांचा समावेश होता. 

या ठिकाणीही चांगली कामगिरी - 
हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 16 जागांसाठी कालच्या शुक्रवारी निवडणूक झाली. येथे भाजपला महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी तीन-तीन जागांवर तर हरियाणा आणि राजस्थानात प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. अशा प्रकारे भाजपने एकूण 57 जागांपैकी 22 जागा जिंकल्या आहेत. 

Web Title: Rajya Sabha Election Result 2022 bharatiya janata party bjp loses four seats in rajya sabha will have to wait to reach 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.