धर्मांतराच्या मुद्यावर राज्यसभा ठप्पच
By admin | Published: December 20, 2014 12:31 AM2014-12-20T00:31:51+5:302014-12-20T04:07:36+5:30
बळजबरीने करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधानांच्या उत्तराच्या मागणीवर ठाम विरोधकांनी शुक्रवारीही कोंडी केल्याने राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली : बळजबरीने करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधानांच्या उत्तराच्या मागणीवर ठाम विरोधकांनी शुक्रवारीही कोंडी केल्याने राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.
धर्मांतराच्या वादावर मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली, तथापि संबंधित मंत्रीच चर्चेला उत्तर देणार असे सांगत सरकारने भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. गदारोळातच उपसभापती पी.जे. कुरियन यांनी दुपारपर्यंत कामकाज तहकूब केले. बळजबरीने धर्मांतर घडवून आणणे किंवा आमिष दाखवित ते घडवून आणणे हे बेकायदेशीर असून तो गुन्हा ठरतो, असे आझाद यांनी नमूद केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)