Rajyasabha Election Result 2022: बिग ब्रेकिंग! राज्यसभेचा पहिला निकाल आला! मीसा भारतींसह पाच उमेदवार बिनविरोध जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 05:07 PM2022-06-03T17:07:58+5:302022-06-03T17:19:27+5:30
Rajyasabha Election Result 2022: महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रतही सातव्या उमेदवारामुळे सहाव्या जागेसाठी पेच फसला आहे.
राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ संपली आणि १० जूनला होणाऱ्या निवडणुकीआधीच बिनविरोध झालेल्या जागांचे निकाल जाहीर झाले. बिहारमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यात आली. पाच जागांसाठी पाचच उमेदवारांनी अर्ज भरले होते.
राष्ट्रीय जनता दलात्या मीसा भारती आणि फय्याज अहमद हे राज्यसभा निडणूक जिंकले आहेत. या दोघांसह एनडीएच्या विजयी उमेदवारांना बिहार विधानसभेत प्रमाणपत्र देण्यात आले. मीसा भारती यांच्यासोबत बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबड़ी देवी देखील विधानसभेत गेल्या होत्या.
Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत
एनडीएच्या घटक पक्षांचे उमेदवार जदयूचे खीरु महतो आणि भाजपाच्या शंभू शरण पटेल व सतीश चंद्र दुबे यांना देखील विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उप मुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, भाजपा प्रदेश अध्यक्ष संजय जयसवाल, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह आदी नेते प्रमाणपत्र देताना उपस्थित होते. न्यूज १८ ने याचे वृत्त दिले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रतही सातव्या उमेदवारामुळे सहाव्या जागेसाठी पेच फसला आहे.
निर्वाचन प्रमाण पत्र के साथ नव निर्वाचित राज्य सभा सांसद श्री खीरू महतो मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार से मुलाकात करते हुए।स्थान 1 अन्ने मार्ग #bihar#NitishKumar#Jdu#Jantadalunited#RajyaSabhapic.twitter.com/918DAsV9DB
— JDU Updates (@JDUupdates) June 3, 2022