Farmers Protest: “मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:44 PM2021-09-03T15:44:41+5:302021-09-03T15:50:17+5:30

शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे.

rakesh tikait brother naresh tikait said we are guilty pm modi and yogi vote was given | Farmers Protest: “मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

Farmers Protest: “मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांसह ८१ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलनआंदोलनकर्त्यांवर कारवाई करत पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना केली अटक

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ८ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. शेतकरी नेते आणि केंद्रातील मोदी सरकार दोन्ही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी ८१ गावातील शेतकऱ्यांनी नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यावरून शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे. (rakesh tikait brother naresh tikait said we are guilty pm modi and yogi vote was given)

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

विविध मागण्यांसह ८१ गावातील शेकडो शेतकऱ्यांनी नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मोठा फौजफाटा तयार तैनात करण्यात आला होता. या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला असून, आम्हीही गुन्ह्यात सहभागी झालो. आम्हीही तितेकच दोषी आहोत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन चूक केली, या शब्दांत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

भारत बंदचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सदर भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. भारतीय किसान परिषदेच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी नोएडा प्राधिकरणासमोर जमले. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. या आंदोलना महिला शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. याआधी बुधवार आणि गुरुवारी पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांना अटक केली होती, अशी माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने २५ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले असून, डाव्या पक्षांनी याला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. 

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

दरम्यान, राकेश टिकैत यांचे सहकारी गुरनाम सिंग चदूनी यांनी मोदी सरकारला थेट सवाल केला आहे. ५० हजार, ५ ते १० लाख शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाला घेरले, तर यांच्याकडे दुसरा काय पर्याय शिल्लक राहील, अशी रोखठोक विचारणा केली आहे. आतापर्यंत शेतकरी आंदोलनासाठी सुमारे ६५० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. ३७ हजार शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आता मागण्या मान्य करण्याचे दोनच मार्ग आहेत. संपूर्ण देशात भाजपला पराभूत करायचे, असे सांगत मात्र, नवीन सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी शंका गुरनाम सिंग यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मोदी सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल. परंतु, भाजप सरकार गेल्यानंतर आपले म्हणणे ऐकले जाईल का, याबाबत साशंकता वाटते, असे सिंग यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: rakesh tikait brother naresh tikait said we are guilty pm modi and yogi vote was given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.