Rakesh Tikait : "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:23 AM2021-09-01T08:23:33+5:302021-09-01T08:32:53+5:30

Rakesh Tikait Controversial Statement And BJP : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Rakesh Tikait controversial statement in sirsa- says bjp plan murder of hindu leader before up election | Rakesh Tikait : "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

Rakesh Tikait : "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

Next

नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी (Rakesh Tikait) पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपापेक्षा घातक कोणताच पक्ष नाही असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सिरसामध्ये ते बोलत होते. तसेच टिकैत यांनी य़ाच दरम्यान एक वादग्रस्त विधान देखील केलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला. "उत्तर प्रदेश निवडणुकांच्या आधी एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होणार आहे. त्यामुळे यांच्यापासून सावध राहा आणि हे एका मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करून देशात हिंदू-मुसलमान या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. 

"भाजपापेक्षा घातक कोणताच पक्ष नाही, देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा"

"भाजपापेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही. ज्या लोकांनी भाजपाची निर्मिती केली, आज त्याच नेत्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे" असं टिकैत यांनी म्हटलं आहे. या "देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. ज्या SDM ने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू" असं ही टिकैत म्हणाले. 

"कर्ज 10 लाखाचं असलं तरी शेतकऱ्याची 50 लाखाची जमीन विकली जाते, हा कसला कायदा?"

राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. मात्र, असं झालं नाही आणि शेतमालालाही दुप्पट भाव मिळाला नाही असंही सांगितलं. तसेच देशातील मोठ्या कंपन्या कर्ज घेऊन ते माफ करून घेतात आणि नंतर याच कंपन्या सरकारी संस्थान खरेदी करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज घेऊन ते भरू शकला नाही तर त्याचं घर आणि जमीनही लिलावासाठी काढली जाते. कर्ज 10 लाखाचं असलं तरीही शेतकऱ्याची 50 लाखाची जमीन विकली जाते. हा कसला कायदा आहे" असा सवालही टिकैत यांनी केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Rakesh Tikait controversial statement in sirsa- says bjp plan murder of hindu leader before up election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.