Rakesh Tikait: 'प्यारे देशवासियों, हिजाबवर नको, बँक घोटाळ्याच्या 'हिसाब'वर आंदोलन करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:20 PM2022-02-14T12:20:21+5:302022-02-14T12:21:13+5:30
Rakesh Tikait: गुजरात बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABG Shipyard Ltd) कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल शेतकरी आंदोलनामुळे देशभर चर्चेत आलेले किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी गुजरातमधीलबँकिंग घोटाळ्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. टिकैत यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या मुद्द्याला धरुन गुजरातच्याबँक घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, देशातील बँक घोटाळ्याविरुद्ध देशातील नागरिकांनी आंदोलन करण्याची गरज असल्याचेही टिकैत यांनी म्हटले आहे.
गुजरात बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABG Shipyard Ltd) कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील 28 बँकांच्या कंसोर्टियमसह 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेला हा बँकिंग फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यावरुन, राकेश टिकैत यांनी ट्विट करुन मोदींवर निशाणा साधला.
मेरे प्यारे देशावासियों... असे म्हणत टिकैत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, कर्नाटकच्या महाविद्यालयातील हिजाब प्रकरणानंतर देशभरात आंदोलन होताना दिसत आहेत. अनेकांनी या मुद्द्यावरुन आपलं मत मांडलं आहे. त्याचा संबंध जोडत राकेश टिकैत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. हिजाबवर नको, देशातील बँकांच्या हिसाबवर म्हणजे बँक घोटाळ्यांवर आंदोनल करायला हव. हीच परिस्थिती राहिली तर देश विकायला वेळ लागणार नाही, आणि आम्ही असं होऊ देणार नाही, असे ट्विट टिकैत यांनी केले आहे.
हिजाब पर नहीं, देश में बैंकों के हिसाब (घोटालों) पर आंदोलन करो मेरे प्यारे देशवासियों। यही हालात रहे तो देश बिकते देर नहीं लगेगी और हम ऐसा होने नहीं देंगे।
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) February 13, 2022
एबीजीविरुद्ध गुन्हा दाखल
ऋषी कमलेश अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवी विमल नेवेटिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (ABG International Pvt Ltd) यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे गुजरातमधील बँक घोटाळा
8 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेने पहिली तक्रार दाखल केली होती. यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी काही स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर बँकेने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली. जवळपास दीड वर्ष तपास केल्यानंतर सीबीआयने तक्रारीवर कारवाई करत 7 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रार नोंदवली. कंपनीने 28 बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जवळपास 2,468.51 कोटी रुपयांचे एक्सपोजर आहे. फॉरेन्सिंग ऑडिटमध्ये असे उघड झाले आहे की, 2012-17 दरम्यान, आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने निधी वळवणे, अनियमितता आणि गुन्हेगारी विश्वास भंग यांसारख्या बेकायदेशीर कृत्ये केली.
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, बँकांनी ज्या उद्देशासाठी निधी जारी केला होता, त्याऐवजी तो अन्य काही कारणांसाठी वापरण्यात आला. दरम्यान, ABG Shipyard Ltd कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत.