भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र
By देवेश फडके | Published: February 17, 2021 10:17 AM2021-02-17T10:17:10+5:302021-02-17T10:19:28+5:30
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे.
रोहतक : दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली. (rakesh tikait declared that now farmers protest kisan panchayat will have in west bengal)
श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी करून टाकले आहे. ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी राकेश टिकैत यांनी यावेळी केली.
काही झाले तरी राम मंदिरासाठी देणगी देणार नाही; सिद्धारामैय्या यांनी केले स्पष्ट
पश्चिम बंगालमध्ये किसान पंचायत
केंद्रीय कृषी कायद्यामुळे सामान्य जनता नाही, तर पशूंचाही भूकबळी जाईल. पश्चिम बंगालमधील शेतकरी दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या पीकाची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे तेथेही किसान पंचायतीचे आयोजन केले जाईल, असे राकेश टिकैत यांनी जाहीर केले. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मते देऊ नका, असे आवाहन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
हनुमंतांनी श्रीरामांना मदत केली
वास्तविक पाहता हनुमंतांचा लंकेशी काही वाद नव्हता. मात्र, प्रभू श्रीरामांना मदत करण्यासाठी ते लंकेत गेले. भाजपवाल्यांचा श्रीरामांशी काही संबंध नाही. त्यांना श्रीरामचंद्रांशी काही घेणे देणे नाही, असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, राकेश टिकैत अनेक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या किसान पंचायतींना संबोधित करत आहेत. केंद्र सरकारविरुद्ध बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात ही सभा होणार आहे. तर, अकोल्यातील किसान कैफीयत शेतकरी महापंचायत रद्द करण्यात आली आहे.