आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:32 PM2021-03-18T19:32:45+5:302021-03-18T19:35:45+5:30

Corona Vaccine: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू असून, राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे.

rakesh tikait demands that those who are protesting here should be given the corona vaccine | आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

Next
ठळक मुद्देआंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणीकोरोनाच्या मार्गदर्शन सूचना पाळल्या पाहिजेत - राकेश टिकैतआंदोलक शेतकऱ्यांप्रमाणे कैद्यांनाही कोरोना लस द्यावी - राकेश टिकैत

नवी दिल्ली : आताच्या घडीला देशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccine) दुसरा टप्पा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशभरातील अनेक नेते, मंत्री यांनी कोरोना लस घेतली आहे. तर दुसरीकडे गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. या पार्श्वभूमी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. (rakesh tikait demands that those who are protesting here should be given the corona vaccine)

शेतकरी आंदोलन करत असलेल्या स्थळांवर करोनासंदर्भातील नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क यांविषयी चिंता व्यक्त केली जात असताना आता थेट आंदोलक शेतकऱ्यांकडून कोरोना लस देण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी. मीही कोरोना लस घेईन, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत

हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलक एकाच ठिकाणी असल्यामुळे या आंदोलकांना कोरोनाची लस देण्याची मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. करोना पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जी लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत, त्यांनाही कोरोना लस दिली गेली पाहिजे. मी स्वत:देखील कोरोना लस घेईन. आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांप्रमाणे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांनाही कोरोनाची लस दिली गेली पाहिजे, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. 

कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

अन्यथा गोदामांना लक्ष्य करू

काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

दरम्यान, वादग्रस्त कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी नेते, प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या असून, केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सूचवाव्यात. त्यानुसार कायद्यात दुरुस्ती केली जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे. सरकारकडून चर्चेची द्वारे अद्यापही खुली आहेत. शेतकरी नेते, प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनही अनेकदा करण्यात आले आहे.

Web Title: rakesh tikait demands that those who are protesting here should be given the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.