"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 08:51 PM2024-11-24T20:51:43+5:302024-11-24T20:52:47+5:30
"टीमला शांततापूर्वक सर्वेक्षण करू द्यायला हवे..."
शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी भारतीय किसान यूनियनच्या कार्यकर्ता बैठकीसाठी बदायूंमधील सहसवान येथे आले होते. येथे भारतीय किसान यूनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत कले. यावेळी टिकैत यांनी पत्रकांशी बोलताना उत्तर प्रदेशातील संभल येथील घटना आणि डीएपी खताच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली.
यावेळी पत्रकारांनी राकेश टिकैत यांना संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या गदारोळासंदर्भात प्रश्न केला. यावर ते म्हणाले, टीमला शांततापूर्वक सर्वेक्षण करू द्यायला हवे. आमचे म्हणणे आहे की, सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल, त्याला देऊन टाका.
संपूर्ण राज्यात डीएपी खताची समस्या -
डीएपी खताच्या मुद्द्यावर बोलताना टिकैत म्हणाले, "केवळ जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यातच डीएपी खताची समस्या दिसून येत आहेत. दर वर्षी, जेव्हा जेव्हा गव्हाच्या पेरणीला सुरुवात होते, तेव्हा तेव्हा शेतकर्यांना डीएपी खताच्या समस्येला सामोरे जावे लागतले. यासाठी, किसान युनियन काय करणार? असे विचारले असता, "डीएपी सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या पोटात आहे. डीएपी व्यापाऱ्यांच्या दुकानात सापडेल. जे ब्लॅकमध्ये विकताना आढळतील त्यांना पकडा.
आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल -
टिकैत पुढे म्हणाले, "डीएपीच्या या आजारापासून दूर रहायला हवे. 40 वर्षांपूर्वी डीएपी होते का? आपल्या पूर्वजांनी डीएपी शिवाय शेती केली. येणाऱ्या काळात ही समस्या आणखी वाढणार आहे. आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल. यावर हा एकमेव उपाय आहे."