Farmers Protest: “शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, बाडयन यांनी मोदींशी बोलावे”: राकेश टिकैत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:47 PM2021-09-24T15:47:58+5:302021-09-24T15:49:24+5:30
Farmers Protest: राकेश टिकैत यांनी जो बायडन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करावी, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे गेल्या ११ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या कालावधीत तब्बल ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. आंदोलक शेतकरी नेते आणि केंद्र सरकार दोन्ही पक्ष आपापल्या मुद्द्यांवर ठाम असल्यामुळे यासंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यातच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. (rakesh tikait says joe biden should discuss with pm narendra modi over farmers protest in india)
What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण
शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच सक्रीय झाले आहेत. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप टिकैत यांनी केला आहे. यानंतर आता थेट बायडन यांना साद घालत पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी, असे म्हटले आहे.
“कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत आमच्या प्रश्नांवर लक्ष द्याल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन. आम्ही भारतीय शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहोत. आंदोलन करताना मागील ११ महिन्यात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. आम्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हे कायदे मागे घेतले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत आमच्या प्रश्नांवर लक्ष द्याल, असे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे. यावेळी राकेश टिकैत यांनी बायडन स्पिक्स अप फॉर फार्मर असा हॅशटॅगही वापला. इतकेच नाही तर राकेश टिकैत यांनी यापूर्वी, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अनिवासी भारतीय शेतकऱ्यांनी मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याविरोधात आंदोलन केल्याचेही ट्विट केले आहे.
“एक दिवस जागतिक स्तरावरील सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील”
Dear @POTUS, we the Indian Farmers are protesting against 3 farm laws brought by PM Modi's govt. 700 farmers have died in the last 11 months protesting. These black laws should be repealed to save us. Please focus on our concern while meeting PM Modi. #Biden_SpeakUp4Farmers
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) September 24, 2021
अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी
दरम्यान, केंद्र सरकार १० महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाही. किमान घंटानादाच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल, असे राकेश टिकैत यांनी म्हटले होते.