Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:10 PM2021-04-12T13:10:46+5:302021-04-12T13:12:23+5:30

Farmers Protest: शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again | Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

Next
ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराशेतकरी आंदोलन सुरूच राहणार - टिकैतआम्ही चर्चेसाठी तयार, सरकारने निमंत्रण द्यावे - टिकैत

नवी दिल्ली: गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) दिल्लीतील विविध सीमांवर सुरू आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिल्लीतील गंभीर परिस्थिती यांमुळे आंदोलक शेतकरी आता आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा येणार आहोत. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, असा निर्धात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. (rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again)

राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा दावा राकेश टिकैत यांनी केला असला तरी, सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

कायदे मागे घेतल्याशिवाय माघार नाही

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी माघार घेऊन घरी जाणार नाहीत. सध्या सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कापणीचा काळ असल्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी घरी परतत आहेत. सरकार दिल्लीत परत आले की, शेतकरीही परत येतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रित करावे

केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी नेते, प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले पाहिजे. २२ जानेवारी रोजी ज्या स्थितीत चर्चा होती. ती पुन्हा तिथूनच सुरू झाली पाहिजे. कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशा मागण्यांवर शेतकरी अजूनही ठाम आहेत, असे टिकैत यांनी नमूद केले आहे. लॉकडाऊन लागला, तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात. 
 

Web Title: rakesh tikait says this is not shaheen bagh farmers protest continue and crowd will come again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.