Rakesh Tikait : "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 04:20 PM2021-10-31T16:20:49+5:302021-10-31T16:30:34+5:30
Rakesh Tikait : दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. या
नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी प्रशासनाला एक इशारा दिला आहे. "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासन येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. जर त्यांनी तसं केलं तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. "जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू" असं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी गुरूवारी रात्रीपासून गाझीपूर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी शेतकरी प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे मार्ग बंदच आहेत.
We have come to know that the administration is trying to pull down the tents here with the help of JCB. If they do that, the farmers will set up their tents at Police stations, DM offices: Rakesh Tikait, BKU leader at Ghazipur (Delhi-UP) border pic.twitter.com/kl684sxsmM
— ANI (@ANI) October 31, 2021
सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात तणाव
राकेश टिकैत यांनी बॅरिकेडसह त्यांचा तंबू उखाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी एकाही शेतकऱ्याचा तंबू हटविला गेला नाही असा दावा केला आहे. दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात काहीसा तणाव आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. शेतकरी आणि पोलीस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका पण...
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 10 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे.