जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

By देवेश फडके | Published: February 15, 2021 01:19 PM2021-02-15T13:19:26+5:302021-02-15T13:21:10+5:30

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.

rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat | जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

Next
ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा सरकारला थेट इशारामागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही - टिकैतसरकार द्वेष पसरवण्याचे काम करत आहे - टिकैत

करनाल : गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. (rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat)

करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) बोलत होते. मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा टोला टिकैत यांनी यावेळी बोलताना लगावला. 

काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

सरकार द्वेष पसवरतंय

दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत, असा निर्धार टिकैत यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला. 

पंच आणि मंच एकच

पंच आणि मंच एकच असेल, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. गाझीपूर सीमेवर नाही तर सिंघू सीमेवरच कार्यालय असेल, असे त्यांनी नमूद केले. सरकारी अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये. त्यांनी गाझीपूर सीमेवर सांगितले असले, तरी सिंघू सीमेवरच कार्यालय असेल. मंच आणि पंच वेगळे राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.