अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:01 PM2023-08-29T12:01:19+5:302023-08-29T12:02:02+5:30

रक्षाबंधनापूर्वी बहिणीने किडनी निकामी झालेल्या भावाला आपली किडनी दान करून या सणाचं महत्त्व वाढवलं ​​आहे.

raksha bandhan 2023 sister saves elder brother life by donate kidney before this festival in delhi | अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

googlenewsNext

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त एक आनंददायी घटना समोर आली आहे. एका बहिणीने तिची एक किडनी भावाला दिली आहे. रक्षाबंधनापूर्वी बहिणीने किडनी निकामी झालेल्या भावाला आपली किडनी दान करून या सणाचं महत्त्व वाढवलं ​​आहे. छोटी बहीण प्रियंका (23) हिने किडनी दान करून भाऊ हरेंद्र (35) याचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाचा मोठा भाऊ हरेंद्र डिसेंबर 2022 पासून डायलिसिसवर होता. हरेंद्रला जानेवारी 2022 मध्ये कळलं की, त्याला किडनी फेलियरची समस्या आहे. त्यामुळे अचानक थकवा येणं, अशक्तपणा, भूक न लागणं अशी लक्षणं त्याला दिसत होती. पण गेल्या वर्षी डिसेंबरपासून त्याने नियमित डायलिसिस करायला सुरुवात केली. त्यानंतर हरेंद्रची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सर्व पाहता त्याची धाकटी बहीण प्रियंका हिने तिची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. पण याआधी लोकांनी प्रियंकाला समजावले होते की, यामुळे तिला नंतर आई होण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि 10 ऑगस्ट रोजी एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, किडनी दान केल्याने स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होत नाही. बहिणीने किडनी दान केल्यानंतर हरेंद्रला नवे जीवन मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. हरेंद्र म्हणतो की, त्याची बहीण एक शक्ती म्हणून त्याच्या पाठीशी उभी आहे आणि तिने मला या रक्षाबंधनाला एक अनमोल भेट दिली आहे. हे खरोखरच भाऊ-बहिणीचं नातं मजबूत करतं आणि महत्त्व वाढवतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: raksha bandhan 2023 sister saves elder brother life by donate kidney before this festival in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.