काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 12:54 PM2020-08-01T12:54:18+5:302020-08-01T12:58:48+5:30
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. मात्र एक असं गाव आहे जिथे तब्बल 50 वर्षांपासून बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधलेली नाही.
गोंडा - 'रक्षाबंधन' हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. मात्र एक असं गाव आहे जिथे तब्बल 50 वर्षांपासून बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधलेली नाही. भीखमपूर जगतपुरवा असं या गावाचं नाव असून ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. या गावात रक्षाबंधनाचा उल्लेखही केला जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील जगतपुरवा येथे 20 घरे अशी आहेत, ज्या घरांमधील जवळपास 200 मुले, तरुण आणि वृद्ध रक्षाबंधनाचे नाव काढले तरी घाबरून जातात. स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच दशकांपासून येथे बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधलेली नाही. या गावातून आसपासच्या गावात गेलेले तरूण जेव्हा आपल्या गावाचे नाव सांगतात ते ऐकूनच आजुबाजूच्या मुली या तरुणांना राखी बांधण्यासाठी पुढे येत नाहीत.
गावकऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळी बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली आहे, तेव्हा गावात काहीना काही अघटीत घटना घडली असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सूर्यनाराण मिश्र यांनी ही परंपरा कशी निर्माण झाली ते सांगितलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 8 वर्षांनंतर म्हणजेच 50 वर्षांपूर्वी (1955) रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी आमच्या पूर्वजाच्या कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तेव्हा पासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत असं म्हटलं आहे.
काहीपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी आग्रह केल्यामुळे रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या दिवशीपण अशीच वाईट घटना घडली. यानंतर असे करण्याची कोणाची हिंमत झाली नाही असं सूर्यनारायण यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आज देखील लोकांमध्ये याची भीती ही कायम आहे आणि त्यामुळेच गावात राखी बांधली जात नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भलं मोठं वीज बिल पाहून तुम्हालाही बसेल 440 व्होल्टचा झटका!https://t.co/ClKKlZpvaY#electricitybill#Farmers
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार
खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल
CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख