लालजींनी 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याची अफवाच...!
By Admin | Published: November 15, 2016 10:34 AM2016-11-15T10:34:02+5:302016-11-15T15:38:43+5:30
सूरतमधील व्यापारी लालजीभाई पटेल यांनी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याचे वृत्त म्हणजे निव्ळ अपवा असल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाचे परिणाम दिसू लागल्याचे पाहायला मिळत आहे. सुरतमधील व्यापारी लालजीभाई पटेल यांनी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती खुद्द लालजीभाई यांनीच दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाव असलेला सूट 4.3 कोटी रुपयांना विकत घेतल्याने हेच लालजीभाई बराच काळ चर्चेत होते. हा सूट विकत घेऊन त्यांनी आपले नाव 'गिनिज बुक'मध्येही नोंदवले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केल्याने लालजीभाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सूरतस्थित हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी सहा हजार कोटी रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे, अनेकांनी हे वृत्त मोठ्या प्रमाणात शेअरही केले. मात्र या वृत्त्ताचा लालजीभाई पटेल यांनी साफ इन्कार केला आहे. ‘मी हिऱ्यांचा व्यापारी आहे. तसेच मी आयात-निर्यातीच्या व्यापारातदेखील सक्रीय आहे. पण मी सहा हजार कोटी रुपयांची रोकड बँकेत जमा केल्याची माहिती चुकीची आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.