गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

By admin | Published: March 1, 2017 04:21 AM2017-03-01T04:21:53+5:302017-03-01T04:21:53+5:30

दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला

A rally in Delhi for Gurmeher | गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

Next


नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियातर्फे धरणे धरण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे.
आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. ती आज आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले. समाजमाध्यमांद्वारे तिने अभाविपवर केलेल्या टीकेमुळे आणि आपले वडील पाकिस्तानचे नव्हे, तर युद्धाचे बळी आहेत, असे म्हणत दोन्ही देशांत सलोखा असावा, असे म्हटल्यामुळे भाजपचे नेते दुखावले होते. तिचे वडील कॅप्टन होते आणि ते कारगिल युद्धात शहीद झाले होते. ती लेडी श्री राम महाविद्यालयात शिकत आहे. ‘मी मोहीम मागे घेत आहे. प्रत्येकाचे अभिनंदन. मला एकटीला राहू द्या, अशी विनंती. मला जे म्हणायचे होते तेच मी म्हटले.’, असे तिने टिष्ट्वटरद्वारे म्हटले आहे.
।गुन्हा दाखल
गुरमेहर कौरला बलात्काराच्या धमक्या आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या धमक्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा तिचा आरोप आहे.
गुरमेहर (२०) हिला धमक्या देणाऱ्यांविरुद्ध ताबडतोब प्रथम माहिती अहवाल दाखल करा अशी मागणी करणारे पत्र दिल्ली महिला आयोगाकडून पोलिसांना मिळाले होते.
।शेकडोंनी काढला मोर्चा
दिल्ली विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी मंगळवारी गुरमेहर कौर हिला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांत एवढा मोठा मोर्चा निघाला नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने जशी प्रक्षोभक होतात तसा दिल्ली विद्यापीठाचा अनुभव नाही.
नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इतर महाविद्यालयांतील विद्वान या मोर्चात सहभागी होते.
दिल्ली विद्यापीठासह देशभर विद्यापीठ परिसरात आवाज दाबून टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांचा निषेध होणे आवश्यक आहे. चर्चा करणे आणि मतभेद व्यक्त करण्यासाठी आम्हाला जागा हवी आहे, असे दिल्ली विद्यापीठातील आॅल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे नेते कंवलप्रीत कौर म्हणाले.

Web Title: A rally in Delhi for Gurmeher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.