राम सेनाप्रमुख अत्तावार स्थानबद्ध

By admin | Published: September 4, 2015 01:20 AM2015-09-04T01:20:11+5:302015-09-04T01:20:11+5:30

धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठविणारे पुरोगामी नेते, संशोधक आणि कानडी लेखक प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या संदर्भात केंद्रीय गुन्हे शाखेने गुरुवारी

Ram commando chief Attaar detained | राम सेनाप्रमुख अत्तावार स्थानबद्ध

राम सेनाप्रमुख अत्तावार स्थानबद्ध

Next

मंगळुरू : धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठविणारे पुरोगामी नेते, संशोधक आणि कानडी लेखक प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या संदर्भात केंद्रीय गुन्हे शाखेने गुरुवारी राम सेनेचा प्रमुख प्रसाद अत्तावार याला मंगळुरू येथे स्थानबद्ध केले. गेल्या ३० आॅगस्ट रोजी धारवाड येथे कलबुर्गी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
अत्तावारचे छायाचित्र असलेले कलबुर्गी हत्याकांडाशी संबंधित काही संदेश सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. हे संदेश त्यानेच पोस्ट केले की अन्य कुणी पाठविले, याचा तपास सुरू आहे. अत्तावार हा २००९पर्यंत प्रमोद मुतालिकच्या नेतृत्वाखालील श्रीराम सेनेचा सदस्य होता. नंतर तो श्रीराम सेनेतून बाहेर पडला आणि त्याने स्वत:ची राम सेना स्थापन केली. ही राम सेना मंगळरू जिल्ह्यात मॉरल पॉलिसिंगसाठी चांगलीच कुख्यात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Ram commando chief Attaar detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.