जलिकट्टूचं समर्थन करणा-यांच्या अंगावर 10 वळू सोडा- रामगोपाल वर्मा

By admin | Published: January 22, 2017 06:44 PM2017-01-22T18:44:20+5:302017-01-22T19:52:48+5:30

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणा-या रामगोपाल वर्मांनी ट्विटरवरून नवे ट्विट करून वाद ओढवून घेतला आहे.

Ram-Gopal Verma, 10-boll on the supporters of Jaliktu's supporters | जलिकट्टूचं समर्थन करणा-यांच्या अंगावर 10 वळू सोडा- रामगोपाल वर्मा

जलिकट्टूचं समर्थन करणा-यांच्या अंगावर 10 वळू सोडा- रामगोपाल वर्मा

Next

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 22 - वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणा-या रामगोपाल वर्मांनी ट्विटरवरून नवे ट्विट करून वाद ओढवून घेतला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तामिळनाडूतील जलिकट्टूला विरोध दर्शवला आहे. जलिकट्टूचं समर्थन करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर कमीत कमी 10 वळू सोडले पाहिजेत. जेणेकरून त्यांना समजेल की हजारो लोक जेव्हा त्याला पळवतात तेव्हा त्या वळूला कसे वाटत असेल, असे ते म्हणाले आहेत.

इतकेच नव्हे तर राम गोपाल वर्मांनी जलिकट्टूच्या आयोजनाची बाजू घेणा-या चित्रपट निर्मात्यांवरही निशाणा साधला आहे. सेलिब्रिटीसुद्धा व्होट आणि तिकीट मिळवण्यासाठीच जलिकट्टूचं समर्थन करत आहेत. तसेच अभिनेते कमल हसन यांनी जलिकट्टूला समर्थन देत विद्यार्थी अहिंसक मार्गानं आंदोलन करत असल्याचं सांगत त्यांचं समर्थन करून त्यांना प्रोत्साहित केल्याचं म्हटलं आहे.
(केजरीवाल दीपिकापेक्षाही हॉट दिसतात - रामगोपाल वर्मा)
(अंगुरलता सारख्या आमदारामुळे 'अच्छे दिन' आलेच समजा - रामगोपाल वर्मा)
रामगोपाल वर्मा म्हणाले, शस्त्रास्त्रे नसणा-या जनावरांवर मनोरंजनासाठी संस्कृती आणि परंपरेच्या नावे हल्ला करणे हे दहशतवादापेक्षाही भयंकर आहे. सरकार चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात कावळा आणि कुत्र्याला यातना देताना दाखवण्यास मज्जाव करते, मात्र संस्कृतीच्या नावाखाली बैलांना होणा-या त्रासाकडे दुर्लक्ष करते. एकंदरीतच जलिकट्टू हा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक-निर्माता रामगोपाल वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचीही खिल्ली उडवली होती. 'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे', अशी उपहासात्मक टीका वर्मा यांनी केली होती.   

          Atleast 10 animals should be set after each #jaijallikattu human protestor for him to know what                       poor bull feels when 1000's are chasing

Web Title: Ram-Gopal Verma, 10-boll on the supporters of Jaliktu's supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.