रामजन्मभूमी : फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या अहिताचे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:58 AM2019-11-25T05:58:27+5:302019-11-25T05:58:49+5:30
अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही.
नवी दिल्ली : अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यावर परिणाम होऊ शकतो, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरूल हसन रिझवी यांनी रविवारी म्हटले आहे.
ते म्हणाले की, फेरविचार याचिका दाखल करून मुस्लिम राममंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण करीत आहेत, अशी हिंदूंची भावना होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मशीद बांधण्यासाठी देऊ केलेली पर्यायी पाच एकर जागा मुस्लिमांनी स्वीकारावी. त्यामुळे न्यायालयाचा सन्मान राखला जाईल. रामजन्मभूमीसंदर्भातील निकाल सर्वांनी मान्य करावा, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले आहे. निकालानंतर ही बैठक झाली होती.
रिझवी म्हणाले की, अयोध्येमध्ये राममंदिर बांधण्यासाठी हिंदूंना मुस्लिमांनी सहकार्य केले
पाहिजे.