Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार धनुर्धारी रामलल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:06 PM2023-04-20T13:06:05+5:302023-04-20T13:06:26+5:30
Ram Mandir, Ayodhya: अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात स्थापन करण्यात येणारी रामलल्लांची मूर्ती धनुर्धराच्या स्वरूपात असेल आणि ती कर्नाटकातील कृष्ण शिळेत कोरलेली असेल, असे राम मंदिराचे काम गावातून आणलेल्या कृष्ण शिळेपासून पाहणाऱ्या ट्रस्टने ठरविले आहे.
अयोध्या : अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात स्थापन करण्यात येणारी रामलल्लांची मूर्ती धनुर्धराच्या स्वरूपात असेल आणि ती कर्नाटकातील कृष्ण शिळेत कोरलेली असेल, असे राम मंदिराचे काम गावातून आणलेल्या कृष्ण शिळेपासून पाहणाऱ्या ट्रस्टने ठरविले आहे.
पाच फूट उंचीची ही मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज हे शिळेतून साकारणार आहेत. मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने याबाबत निर्णय घेतले. ट्रस्टचे सदस्य स्वामी तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी सांगितले की, भगवान श्रीरामाची नवीन मूर्ती पाच फूट उंच असेल. ही उभी मुद्रा असलेली मूर्ती धनुष्यबाण धारण केलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात असेल. कर्नाटकातील करकर व हेगे देवेन कोटे गावातून आणलेल्या कृष्णशिळेपासून मूर्तीला आकार दिला जाईल. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, आम्हाला संत व हिंदू विद्वानांकडून सूचना मिळाल्या आहेत की, ही रामलल्लांची मूर्ती त्यांच्या बालपणीची, ५-६ वर्षांच्या बालकाची असावी. एकच उभी मुद्रा असणारी मूर्ती असावी, असा विचार आहे.
पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिराच्या उच्चस्तरीय समितीने मूळ गाभायात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना शिळांचा सखोल तांत्रिक होण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असल्याचेही आणि धार्मिक अभ्यास ते म्हणाले. अयोध्येत मंदिराच्या बांधकामाचे केला. त्यानंतर मूर्तीसाठी भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.
कृष्णशिळेची निवड
राय म्हणाले की, संत शिल्पकार, हिंदू धर्मग्रंथाचे तज्ज्ञ, अभियंंते आणि मंदिर पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या कृष्ण शिळेची निवड करण्यात आली.