प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 02:40 PM2023-12-25T14:40:19+5:302023-12-25T14:40:50+5:30

येत्या 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापणा होणार आहे.

Ram Mandir ayodhya No chief minister of any state is invited for the installation of Lord Sri Rama; What is the reason? | प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

अयोध्या: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. तत्पुर्वी या कार्यक्रमाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार नाही. याचे कारणही समोर आले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य होणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यजमान राज्य असल्याने, केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ आणि राज्यपाल प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होतील.

ही आहे प्राण प्रतिष्ठेची वेळ
अवघ्या 1 मिनिट 24 सेकंदात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. काशीच्या पंडितांनी हा शुभ मुहूर्त निश्चित केला आहे. द्रविड बंधू पंडित गणेशवर शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी मूल मुहूर्त दुपारी 12:29 वाजून 8 सेकंदापासून सुरू होईल, जो 12:30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत चालेल. म्हणजे प्राणप्रतिष्ठेसाठी एकूण वेळ फक्त 1 मिनिट 24 सेकंद असेल. या मुहूर्ताचे शुद्धीकरणही केले जाणार आहे. हे काशीतील विद्वान पंडितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अनेक मान्यवरांची उपस्थिती
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्टेची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 7 हजार लोकांना निमंत्रण पाठवले जाणार असून त्यापैकी 3 हजार व्हीव्हीआयपी असतील. पीएम मोदी, सीएम योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह ३ हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कंगना रणौत यांचीही नावे आहेत. याशिवाय देशभरातून 4000 संतांना पाचारण करण्यात येत आहे.

Web Title: Ram Mandir ayodhya No chief minister of any state is invited for the installation of Lord Sri Rama; What is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.