कार्यशाळेतून राम मंदिर परिसरात आणण्यात आली रामललांची मूर्ती, रामभक्त झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:00 AM2024-01-18T00:00:33+5:302024-01-18T00:01:25+5:30
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येतील रामललांचा गृह प्रवेश झाला आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत रामललांची मूर्ती मंदिर परिसरामध्ये आणण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येतील रामललांचा गृह प्रवेश झाला आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत रामललांची मूर्ती मंदिर परिसरामध्ये आणण्यात आली आहे. यावेळी हनुमान गढीसमोर शेकडो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
पोलिसांचा फौजफाटा आणि शेकडो वाहने रामललांची मूर्ती असलेल्या ट्रकसोबत होत्या. रामललांचा आगमन सोहळा पासून तिथे उपस्थित असलेले भाविक भावूक झाले. ही मूर्जी मंदिरात आणताच तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी जयजयकार केला.
अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पहिले सहा दिवस चालणाऱ्या विधीचा आज दुसरा दिवस होता. या घडीला संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे. आज शरयू नदीच्या किनारी कलश पूजन केलं गेलं. तसेच शरयू नदीच्या पवित्र जलाने राम ललांच्या गर्भगृहाचं शुद्धिकरण करण्यात आलं. हे अनुष्ठान २२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ११ पुजारी सर्व देविदेवतांचं आवाहन करत अनुष्ठान करत आहेत. सर्वसाधारणपणे यजमान हा अनुष्ठानातील मुख्य पूजारी असतो. यजमानाकडूनच प्रार्थना केली जाते.