रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:53 PM2024-01-20T12:53:03+5:302024-01-20T12:53:37+5:30

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाल्यावर श्री राम आणि सीतेची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या होत्या. मात्र या शिळांचा वापर हा मूर्ती घडवण्यासाठी करण्यात आला नाही.

Ram Mandir Ayodhya: What happened next to those stones brought from Nepal to make the idol of Ramlal? The information is coming up | रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती  

रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती  

अयोध्येत होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या रामललांच्या मूर्तीचे सुंदर फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा लोकांमधील उत्साह वाढत आहे. दरम्यान, राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाल्यावर श्री राम आणि सीतेची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या होत्या. मात्र या शिळांचा वापर हा मूर्ती घडवण्यासाठी करण्यात आला नाही. तर कर्नाटकमधील म्हैसूरच्या अरुण योगिराज यांनी निवडलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवड करण्याात आली आहे.

दरम्यान, नेपाळमधून आणण्यात आलेल्या शाळीग्राम शिळा ह्या मूर्ती घडवण्यासाठी योग्य नसल्याचे चाचणीत समोर आले होते. अयोध्येत आलेल्या नेपाळमधील प्रतिनिधींच्या मते या शिळांची तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानंतर मूर्तिकारांनी अशा शिळांमध्ये मूर्ती घडवणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर कर्नाटकमधून आणलेल्या एका प्राचीन शिळेचा वापर करून रामललाची मूर्ती घडवण्यात आली.

श्रीराम आणि माता सीतेची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून शाळीग्राम शिळा आणण्यात आल्या होत्या. मात्र या शिळा मूर्ती घडवण्यासाठी अयोग्य असल्याचे समोर आले होते. नंतर जिथे राम मंदिर उभं राहत आहे तिथे या शिळा सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे. मंदिर परिसरातील अधिकाऱ्यांच्या मते भलेही या शिळांचा वापर मूर्ती घडवण्यासाठी केला गेला नसेल तरी या शिळा श्रद्धापूर्वक राम मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आल्या आहेत.  
 

Web Title: Ram Mandir Ayodhya: What happened next to those stones brought from Nepal to make the idol of Ramlal? The information is coming up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.