पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 04:45 PM2020-08-05T16:45:00+5:302020-08-05T16:51:28+5:30
राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
अयोध्या - राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले, यावेळी त्यांनी जगातील किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात भगवान राम आहेत हे सांगितले. पंतप्रधान म्हणाले, भारताच्या आस्थेत राम आहेत, भारताच्या आदर्शात राम आहेत, भारताच्या दिव्यतेत राम आहेत आणि भारताच्या दर्शनातही राम आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, तुलसींचे राम सगूण राम आहेत. तर नानक आणि कबिरांचे राम निर्गूण राम आहेत. भगवान बुद्धदेखील रामाशी जोडले गेले आहेत. तर वर्षानूवर्षांपासून अयोध्या नगरी जैन धर्मीयांच्या आस्थेचे केंद्रदेखील राहिली आहे. रामचंद्रांची हीच सर्वव्यापकता भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडवते. आजही भारताबाहेर डझनावर देश असे आहेत. जेथील भाषेत रामकथा प्रचलित आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज या देशांतही कोट्यवधी लोकांना राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाल्याने आनंद होत असेल. कारण राम सर्वांचेच आहेत, सर्वांमध्येच आहेत. जीवनाचा असा एकही भाग नाही, जेथे आपले राम प्रेरणा देत नाहीत. भारताच्या आस्थेत राम आहेत, भारताच्या आदर्शात राम आहेत, भारताच्या दिव्यतेत राम आहेत आणि भारताच्या दर्शनातही राम आहेत.
कसे असेल राम मंदिर -
राम मंदिर कसे असेल, यावर बोलताना मोदी म्हणाले, मला विश्वास आहे, की प्रभू श्रीरामांप्रमाणेच हे राम मंदिरही भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे द्योतक असेल. येथे उभारले जाणारे राम मंदिर अनादी काळापर्यत मानवतेला प्रेरणा देणारे असेल. भगवान श्रीरामांचा संदेश, आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत अनादीकाळापर्यंत कसा पोहोचत राहील, हे आपल्याला निश्चित करायचे आहे.
मोदी म्हणाले, आपल्या ज्ञानाची, आपली जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची जगाला कशी ओळख होईल, ही आपल्या सर्वांची, आपल्या वर्तमानातील आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे. राम वेळ, स्थान आणि परिस्थितीनुसार, बोलतात, विचार करतात आणि कार्य करतात. राम आपल्याला वेळेनुसार पुढे चालायला शिकवतात. राम परिवर्तनाचा पुरस्कार करणारे आहेत, राम आधुनिकतेचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांच्या याच प्रेरणेने आणि आदर्शांवर भारत आज पुढे जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी
Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...