Ram Mandir Bhumi Pooja: नरेंद्र मोदी राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल ; पाहा कसा असणार संपूर्ण दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 11:43 AM2020-08-05T11:43:10+5:302020-08-05T11:44:05+5:30
अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे.
नवी दिल्ली: देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं अयोध्येत दाखल झाले आहे. नरेंद्र मोदी आधी हनुमान गढीला भेट देणार असून त्यानंतर तिथून ते राम जन्मभूमी परिसराकडे रवाना होणार आहे.
Prime Minister Narendra Modi arrives in Ayodhya for foundation stone-laying of #RamTemple, received by Chief Minister Yogi Adityanath and others.
— ANI (@ANI) August 5, 2020
Social distancing norms followed by those present to receive the Prime Minister. pic.twitter.com/DvJbIlDLRb
असा असेल नरेंद्र मोदींचा दौरा
११.३० । अयोध्या येथील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर करणार लँडिंग
१२.०० । रामजन्मभूमी परिसरात पोहोचणार. त्यानंतर दहा मिनिटात रामलल्लाचं दर्शन घेणार. पूजन करणार.
१२.१५ । रामलल्ला परिसरात पारिजातच्या झाडाचं रोप लावणार
१२.३० । भूमिपूजन सुरू होणार
१२.४० । राममंदिराची आधारशिला स्थापन करणार
०१.१० । नृत्यगोपालदास वेदांती यांच्यासह ट्रस्ट कमिटीची भेट घेणार
०२.०५ । साकेल हेलिपॅडकडे रवाना होणार
०२.२० । हेलिकॉप्टरने लखनऊकडे प्रस्थान करणार
अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.
#WATCH live: PM Narendra Modi in Ayodhya for #RamTemple foundation stone laying ceremony. https://t.co/yo5LpodbSz
— ANI (@ANI) August 5, 2020