Ram Mandir Bhumi Pujan: रामदेव बाबा अयोध्येत; राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी 'भव्यदिव्य' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 11:51 AM2020-08-05T11:51:26+5:302020-08-05T11:52:40+5:30
Ram Mandir Bhumi Pujan: राम मंदिर भूमिपूजनासाठी रामदेव बाबा अयोध्येत दाखल
अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अयोध्येत आगमन झालं आहे. थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न होईल. कोरोनाचं संकट असल्यानं अनेकांना या सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदींसह केवळ पाच जण उपस्थित असणार आहेत.
योगगुरू रामदेव बाबा राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय, हे आपल्या सगळ्याचं सौभाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देशात रामराज्य आणण्यासाठी पतंजली योगपीठ अयोध्येत भव्यदिव्य गुरुकुल उभारेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. पतंजलीच्या गुरुकुलात जगभरातून येणाऱ्या व्यक्ती वेद, आयुर्वेद यांचा अभ्यास करू शकतील, असं त्यांनी सांगितलं.
India's biggest fortune that we're witnessing #RamMandir event...To establish 'ram rajya' in this nation, Patanjali Yogpeeth will make a grand 'gurukul' in #Ayodhya. People from all over the world will be able to study Ved, Ayurved here: Yog Guru Ramdev at Ram Janambhoomi site pic.twitter.com/qygs6AlJau
— ANI (@ANI) August 5, 2020
राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' स्थापित होईल, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजलं आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.