Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:06 PM2020-08-05T17:06:53+5:302020-08-05T17:11:33+5:30
पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला.
हैदराबाद - अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे.
India is a secular country. Prime Minister has violated the oath of the office by laying the foundation stone of #RamMandir. This is the day of the defeat of democracy and secularism and success of Hindutva: AIMIM chief Asaduddin Owaisi pic.twitter.com/nfgOyAIK0o
— ANI (@ANI) August 5, 2020
दरम्यान, ओवेसी यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनावरून काँग्रेसवरही घणाघाती टीका केली. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे. देशातील सेक्युलर पक्षांचं पितळ पूर्णपणे उघडं पडलं आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला.
Congress is equally responsible for the demolition of Babri Mosque. These secular parties have been completely exposed: AIMIM chief Asaduddin Owaisi #RamMandirpic.twitter.com/euIfdgzQG4
— ANI (@ANI) August 5, 2020
आज आपण खूप भावूक झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. मात्र मीसुद्धा तितकाच भावूक झालो आहे. सौहार्द आणि नागरिकत्वामधील समानतेवर माझा विश्वास आहे. मात्र आज ४५० वर्षांपासून तिथे उभ्या असलेल्या मशिदीसाठी मी भावूक झालो आहे, असे ओवेसी म्हणाले.