अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 01:53 PM2024-01-22T13:53:10+5:302024-01-22T13:54:26+5:30
Ram Mandir : राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका घेणाऱ्या अनेक नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
आता सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये उमा भारतींना भेटल्यानंतर साध्वी ऋतंभरा ह्या बराच वेळ रडताना दिसत होत्या. त्यानंतर उमा भारती यांनी साध्वी यांना सावरले. त्यांचे अश्रू पुसले. त्यावेळी साध्वी निरंजन ज्योती ह्याही या दोघींना पाहून भावूक झाल्या आणि त्यांच्याजवळ आल्या.
राम मंदिर आंदोलनाचा इतिहास पाहिल्यास दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वी उमा भारती यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ५०० वर्षांच्या संघर्षामध्ये आम्हालाही भागीदारीची संधी मिळाली. हा माझ्यासाठी परमानंदाचा विषय आहे.
राम मंदिर आंदोलन ऐन भारात असताना साध्वी ऋतंभरा यांनी सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा दिली होती. अखेर अनेक वर्षे चाललेल्या न्यायालयीन संघर्षानंतर अयोध्येतील जन्मभूमीवर राम मंदिर उभं राहिलं आहे.