'मी देव-अल्लाची शपथ घेऊन सांगते...', श्रीराम प्राणप्रतिष्ठेवरुन ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:49 PM2024-01-09T16:49:27+5:302024-01-09T16:50:03+5:30
'मी कधीही हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही. धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही.'
Ram Mandir Pran Pratishtha: सध्या देशभरात श्रीराम मंदिराचीच चर्चा सुरू आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंगळवारी (9 जानेवारी) भाजपवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे उद्घाटन करून भाजप नाटक करत आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी ने कहा, "कल मुझसे राम मंदिर को लेकर पूछा गया... मैं उस उत्सव पर विश्वास रखती हूं जो सभी को साथ लेकर चले, सबके बारे में बात करे... आपको जो करना है करिए, आप चुनाव से पहले गिमिक कर रहे हैं करिए, मुझे कोई दिक्कत नहीं है लेकिन दूसरे समुदाय के लोगों की… pic.twitter.com/fNGmx0ZC2k
— ANI_HindiNews (@AHindinews) January 9, 2024
ममता बॅनर्जी बंगालच्या जयनगरमध्ये म्हणाल्या की, "मला राम मंदिराबद्दल विचारण्यात आले होते. मी सर्वांना एकत्र आणणाऱ्या उत्सवावर विश्वास ठेवते. भाजपवाले फक्त नाटक करत आहेत. निवडणुकीपूर्वी तुम्हाला जे हवे ते करा, मला काही अडचण नाही. पण इतर समाजाच्या लोकांची उपेक्षा करणे योग्य नाही. मी देवाची, अल्लाहची शपथ घेऊन सांगते, मी जिवंत असेपर्यंत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव होऊ देणार नाही. धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही."
TMC काय म्हणाली?
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी यांना निमंत्रित करण्यात आले आहे, परंतु त्या या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्तसंस्थेने सांगितले होते. पीटीआयशी बोलताना टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्यानेही सांगितले होते की, “ममता बॅनर्जी किंवा टीएमसीच्या इतर कोणत्याही प्रतिनिधीने अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धर्मात राजकारण मिसळण्यावर आमचा विश्वास नाही."