अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:16 PM2024-01-15T18:16:19+5:302024-01-15T18:17:12+5:30

Ram Mandir Inauguration: श्रीराम मंदिरात प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती बसवण्यात येणार आहे.

Ram Mandir Inauguration: Selection of Arun Yogiraj's idol; Official announcement of Sri Ramjanmabhoomi Tirtha Kshetra Trust | अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा

अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा

Ram Mandir Inauguration: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी (15 जानेवारी) याची अधिकृत घोषणा केली. या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले.

चंपत राय म्हणाले की, अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची आणि इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली आहे. मंदिरात रामाची जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे, बाल्यावस्थेतील श्रीराम आहेत. राम मंदिरासाठी तीन मूर्तिकारांनी रामललाची मूर्ती बनवली होती. त्यापैकी अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची अंतिम निवड करण्यात आली आहे.

जुन्या मूर्तीचे काय होणार?
इतके दिवस ज्या मूर्तीची पूजा केली जात होती, त्याचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. यावर चंपत राय यांनी सांगितले की, जुनी मूर्ती मंदिराच्या आवारातच राहणार आहे. तसेच, प्राणप्रतिष्ठेचा पूजाविधी बुधवारपासून (16 जानेवारी) सुरू होणार असून तो 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 22 जानेवारी रोजी गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल, अशी माहिती चंपत राय यांनी यावेळी दिली. 

 

Web Title: Ram Mandir Inauguration: Selection of Arun Yogiraj's idol; Official announcement of Sri Ramjanmabhoomi Tirtha Kshetra Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.