अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:41 PM2024-06-14T17:41:47+5:302024-06-14T17:42:11+5:30

Ram Mandir Terror Attack Alert: ही धमकी मिळाल्यानंतर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Ram Mandir Terror Attack Alert : Threat of attack on Shri Ram Mandir in Ayodhya; Jaish-e-Mohammed threatened... | अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

Ram Mandir Terror Attack Alert : गेल्या काही दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या मिळत आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये 3 ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत. अशातच, आता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने राम मंदिरावर हल्ल्याचा ऑडिओ जारी केला आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

अयोध्येत NSG हब तयार होणार
अयोध्येतील सुरक्षेच्या दृष्टीने येथे 'नॅशनल सिक्युरिटी गार्ड' (NSG) हब तयार करण्यात येत आहे. हे देशातील सहावे केंद्र असेल. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे NSG हब तयार करण्यात आली आहेत. आता अयोध्येतही NSG हब तयार होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे हब तयार करण्यात येणार आहे. राम मंदिराजवळ या हबचे तळ असेल. एनएसजी हब बांधल्यानंतर ब्लॅक कमांडोही तैनात केले जातील.

जैश-ए-मोहम्मदने 2005 मध्ये अयोध्येत हल्ला केला होता
अयोध्या राम मंदिरावर हल्ल्याचा इशारा देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने याआधीही येथे हल्ला केला आहे. 2005 मध्ये या दहशतवादी संघटनेने दारुगोळ्याने भरलेल्या जीपने मंदिरावर हल्ला केला होता. हा हल्ला 5 जुलै 2005 रोजी झाला होता. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा असाच धोका समोर आला आहे. 

Web Title: Ram Mandir Terror Attack Alert : Threat of attack on Shri Ram Mandir in Ayodhya; Jaish-e-Mohammed threatened...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.