भाविकांसाठी राममंदिर जानेवारीत खुले होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:08 AM2023-05-25T07:08:24+5:302023-05-25T07:08:34+5:30
रामजन्मभूमी मार्गाची रुंदी ३० मीटर आणि भक्तिमार्गाची रुंदी १४ मीटर असेल.
लखनौ : अयोध्येमधील राममंदिर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा वेग वाढविला आहे.
यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने एका पत्रकात म्हटले आहे की, अयोध्येतील सहादतगंज ते नया घाटपर्यंतच्या १३ किमी लांबीच्या रामपथाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. रामजानकी पथ व भक्तिपथाच्या बांधणीची रूपरेषाही तयार आहे. अयोध्या रेल्वेस्थानक व विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी येथील राममंदिर व हनुमानगढी येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास या रस्त्यांमुळे अधिक सुखकर होणार आहे.
रामजन्मभूमी मार्गाची रुंदी ३० मीटर आणि भक्तिमार्गाची रुंदी १४ मीटर असेल. अयोध्येतील राममंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित
राहण्यासाठी अनेक लोकांना निमंत्रणे दिली जाणार आहेत.