राम रहीम, आसारामसह १४ बाबा आहेत ‘भोंदू’!, राधे माँचाही समावेश, आखाडा परिषदेने जाहीर केली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:31 AM2017-09-11T05:31:33+5:302017-09-11T05:31:55+5:30

स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने रविवारी १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे माँचाही समावेश आहे.

Ram Rahim, Asaram, 14 babas are 'Bhondu', Radhe Maa also included, Akhada Parishad announced list | राम रहीम, आसारामसह १४ बाबा आहेत ‘भोंदू’!, राधे माँचाही समावेश, आखाडा परिषदेने जाहीर केली यादी

राम रहीम, आसारामसह १४ बाबा आहेत ‘भोंदू’!, राधे माँचाही समावेश, आखाडा परिषदेने जाहीर केली यादी

googlenewsNext

अलाहाबाद : स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने रविवारी १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे माँचाही समावेश आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १३ आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. भोंदू बाबांची यादी जाहीर करताना महंत नरेंद्रगिरी म्हणाले की, आम्ही सामान्य नागरिकांना आवाहन करत आहोत की, अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावे. अशा व्यक्ती कोणत्याही संपद्रायाच्या नाहीत. आपल्या कृत्यांमुळे साधू-संतांना कलंकित करण्याचे काम ते करत आहेत.
नरेंद्रगिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही ही यादी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विरोधी पक्षांना सोपवून या भोंदू बाबांवर कारवाईची मागणी करणार आहोत. (वृत्तसंस्था)

कोण आहेत नकली बाबा?

राम रहीम, आसाराम बापू, नारायण साई, रामपाल, निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह,
राधे माँ, सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, स्वामी असीमानंद, ओम बाबा उर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, आचार्य कुशमुनी, बृहस्तपती गिरी आणि मखलान सिंह यांची नकली बाबांच्या यादीत नावे आहेत.

आमचे बाबा यादीत नको; महंतांना धमकी

नकली बाबांच्या यादीत जर आमच्या बाबांचे नाव आले तर तुम्हाला ठार मारू, अशा धमकीचा फोन आपल्याला आल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले. धमकी देणारा स्वत:ला आसाराम यांचा अनुयायी सांगत होता. नरेंद्रगिरी यांच्या तक्रारीवरून अलाहाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकांनी नकली बाबांपासून सावध राहावे. साधू व संत संन्यासी परंपरा, नाथ परंपरा, वैष्णव परंपरा, शैव संप्रदाय आदींमधून येतात, तर नकली बाबांचा संप्रदाय किंवा परंपरा नसते. - महंत नरेंद्रगिरी, अध्यक्ष, आखाडा परिषद

‘संत’पदाची पद्धत ठरविणार
‘संत’पद बहाल करण्याची निश्चित पद्धत ठरविण्यात येणार असल्याचे आखाडा परिषदेने ठरविले आहे.
 एखाद्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करूनच हे पद बहाल करण्यात येणार आहे.
 या व्यक्तीची जीवनशैली आणि संपूर्ण माहिती एकत्रित केली जाणार आहे.
 एका संताजवळ कोणतीही नगदी किंवा अन्य संपत्ती असायला नको. ही संपत्ती ट्रस्टची असायला हवी. त्याचा उपयोग जनकल्याणासाठी व्हायला हवा.

Web Title: Ram Rahim, Asaram, 14 babas are 'Bhondu', Radhe Maa also included, Akhada Parishad announced list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.