हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:21 AM2024-10-02T10:21:31+5:302024-10-02T10:24:14+5:30

हरियाणा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत, याआधी आता राम रहीम २० दिवसासाठी तुरुंगातून बाहेर येणार आहे.

Ram Rahim out of jail during Haryana elections He will stay in Baghpat Ashram for 20 days | हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार

हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम रहीम याला २० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता राम रहीम २० दिवसांसाठी बाहेर येणार आहे. हे दिवस राम रहीम बागवत येथील आश्रमात राहणार आहे. आज बुधवारी राम रहीम रोहतक येथील सुनारिया तुरुंगातून बाहेर येणार आहे. मागील चार वर्षात १५ वेळा राम रहीम याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी

निवडणूक आयोगाने सोमवारी राम रहीम याच्या पॅरोलच्या विनंतीचा अर्ज मंजूर केला. मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले होते की, हरियाणा सरकार या पॅरोलवर विचार करेल. यासाठी पॅरोल अर्जातील कारणे खरी असली पाहिजेत. यासह निवडणूक आचार संहितेचे पालन केले पाहिजे, असंही त्यांनी सांगितले होते. 

निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर हरियाणा सरकारनेही पॅरोलला मंजूरी दिली. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर् राम रहीमला पॅरोलवर सोडले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये त्याचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. गुरमीत राम रहीमने २० दिवसांचा पॅरोल मागितला होता. पॅरोलच्या कालावधीत त्याने उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहण्याची मागणी केली होती. गुरमीत राम रहीमला पॅरोल कालावधीत हरियाणामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. तो वैयक्तिकरित्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ शकत नाही. याशिवाय त्याच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

महापालिका आणि राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान तो तुरुंगातून बाहेर आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीम याला तीन आठवड्यांसाठी फरलो देण्यात आला होता. मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी त्याला २० वर्षाची शिक्षा झाली आहे.

Web Title: Ram Rahim out of jail during Haryana elections He will stay in Baghpat Ashram for 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.