तुरुंगात राम रहीमला हनीप्रीतच्या हातून हवा मसाज! कोर्टात केली होती याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 11:37 AM2017-09-02T11:37:28+5:302017-09-02T20:20:38+5:30
बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेला गुरमीत राम रहीम सध्या हनीप्रीत इन्सानच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे.
पंचकुला, दि. 2 - बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेला गुरमीत राम रहीम सध्या हनीप्रीत इन्सानच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे. तुरुंगात हनीप्रीतला सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी त्याने याचिकाही केली होती. पण सीबीआय कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. हनीप्रीत गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. या दोघांमध्ये वडील आणि मुलीचे नाते असले तरी, त्यांच्या संबंधांबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
हनीप्रीतपासून विभक्त झालेल्या तिच्या नव-याने मागच्या आठवडयात राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला होता. हनीप्रीत राम रहीमची मदतनीस असण्याबरोबरच त्याची फिजियोथेरपीस्ट तसेच त्याला मसाजही करायची. सध्या हरयाणा पोलिसांनी हनीप्रीत इन्सान विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवण्याचा कट रचला होता. त्यात हनीप्रीत सहभागी असल्याचा आरोप आहे.
डे-यातील दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला सीबीआय कोर्टाने 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर हनीप्रीतला राम रहीमसोबत पळून जायचे होते. न्यायालयाच्या निकालानंतर वडील आणि मुलीने एकत्र राहण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका केली होती. हनीप्रीतने तिच्या वकिलाकरवी तर राम रहिमने स्वतंत्र याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने दोघांची याचिका फेटाळून लावली.
तुरुंगात वेगळे ठेवले
राम रहीम याला इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेले आहे. राम रहीम याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर, त्याच्या पाठीराख्यांनी जो हिंसाचार केला, त्यामुळे तुरुंगातील कैदी संतापलेले आहेत. माहिती राम रहीम याच्यासोबत एकाच खोलीत असलेल्या व शुक्रवारी जामिनावर सुटलेल्या कैद्याने दिली आहे. बाबाच्या पाठीराख्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे कैदी संतापलेले आहेत.राम रहीम याला वेगळे ठेवले गेले नसते, तर कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता, असे तो कैदी म्हणाला. तो राम रहीमबरोबर सोनारिया (तुरुंगात पाच दिवस एकत्र होता.
राम रहीमचे फोटो नाल्यात
राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरातील तुंबलेल्या काही नाल्यांची पाहणी केली असता, त्यात राम रहीम याचे शेकडो फोटो आढळले. मीरा चौक आणि सुखाडिया सर्कलमधील नाले या फोटोंमुळे तुंबले होते. त्यात १०० पेक्षा जास्त फोटो व राम रहीमची भित्तिपत्रके टाकून दिली होती. हे फोटो आणि भित्तिपत्रके बाबाच्या अनुयायांनी टाकल्याचा अंदाज आहे.