पॅरोलवर तुरुंगाबाहेर येताच राम रहिमचा म्युझिक व्हिडिओ रिलीज, तृणमूल खासदाराची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 02:29 PM2022-10-26T14:29:37+5:302022-10-26T14:30:44+5:30
राम रहिमला मिळणाऱ्या विशेष सुविधेमुळए TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे.
Ram Rahim Music Video:स्वयंघोषित गुरू आणि बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीम सध्या 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राम रहीमने त्याचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. दिवाळीच्या रात्री रिलीज झालेला हा व्हिडिओ यूट्यूबवर हिटलिस्टमध्ये आला आहे. गेल्या 24 तासांत म्युझिक व्हिडिओला 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
After online satsang Baba Rape Rahim puts out music video while out on parole.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 26, 2022
Unlike US & UK, India lacks codified parole legislation. Parole cannot solely be left to biased state govt officials on pick & choose basis.
High time law is changed.
पॅरोलवर सुटलेला गुरमीत इथेच थांबला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो नियमितपणे ऑनलाइन सत्संग करत आहे. भाजपचे अनेक नेतेही या शिबिरात सहभागी होत आहेत. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी यावरुन खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, हरियाणा सरकार ज्या प्रकारे पॅरोल सुविधा देत आहे, ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. मोइत्रा यांनी ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणे कोडिफाइड पॅरोलची वकिली केली.
यूट्यूबवर गाणे हिट
सेंट एमएसजी या यूट्यूब चॅनेलवर 'साडी नाईट दिवाळी' नावाचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यूएस आणि यूके सारख्या कोडिफाइड पॅरोल कायद्याची मागणी केली. त्यांनी जोर दिला की पॅरोल केवळ पक्षपाती राज्य सरकारी अधिकार्यांच्या निवडीच्या आधारावर सोडले जाऊ शकत नाही. मोइत्रा यांनी ट्विट केले की, "यूएस आणि यूकेप्रमाणे, भारतात कोडिफाइड पॅरोल कायद्याचा अभाव आहे."
राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे
आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला राम रहिम अलीकडेच 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. यादरम्यान तो सत्संग घेत असून, त्याचे अनेक अनुयायी सत्संगात येत आहेत. यावेळी त्याने हनीप्रीतची डेरामधील भूमिकाही स्पष्ट केली. विशेष म्हणजे, हनीप्रीतही तुरुंगात आहे. राम रहिमसोबत तिच्यावरहीर गंभीर गुन्हे दाखल आहेत.