Akshay Kumar Ram Setu: ‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:41 PM2022-08-28T16:41:15+5:302022-08-28T16:44:59+5:30

Akshay Kumar Ram Setu: अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित अन्य आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

ram setu cinema in trouble bjp subramanian swamy issued legal notice to bollywood actor akshay kumar including 8 others | Akshay Kumar Ram Setu: ‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का?

Akshay Kumar Ram Setu: ‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का?

Next

नवी दिल्ली:बॉलिवूड आणि वाद हे समीकरण गेली अनेक वर्षे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काही चित्रपटांविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट नेटकऱ्यांच्या टार्गेटवर असल्याचे सांगितले जात आहे. याच वादाचा आता नवीन अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा नवा रामसेतू (Ram Setu) चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपच्या एक ज्येष्ठ नेत्याने अक्षय कुमारला यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित इतर आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘राम सेतू’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वापरण्यात आली आहे. यावरूनच ते संतापले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही अक्षय कुमारवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्याची सवय 

मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल माहिती देण्यासाठी मी अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित आठ लोकांविरुद्ध वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. 

दरम्यान, राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचा तपास तो चित्रपटात करत असतो. यामध्ये अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यादेखील भूमिका आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: ram setu cinema in trouble bjp subramanian swamy issued legal notice to bollywood actor akshay kumar including 8 others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.