गोविंदराव आदिकांना सर्वपक्षीय श्रध्दांजली राम शिंदे : भल्याभल्यांना जमले नाही ते आदिकांनी केले
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:10+5:302015-06-25T23:51:10+5:30
अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्ाचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले.
Next
अ मदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्ह्याचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले. येथील सहकार सभागृहात या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिंदे होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह आ. भाऊसाहेब कांबळे, आ. सुधीर तांबे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकु टे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह माजी आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्ष नेते विखे यांनी आदिक यांनी नगर जिल्ह्याची ओळख राज्याला आणि देशाला करून दिली. राजकीय धु्रवीकरणात त्यांनी कधीच व्यक्त राजकारण केले नाही. शेतीला बारामाही पाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून श्रीरामपूरचा विकास झाला. मुळा प्रवरा संस्थेत त्यांचा मोठा वाटा होता. सर्वक्षेत्रातील उपेक्षितांना त्यांनी सोबत घेतले. कुशाग्र बुध्दी, कुशल संघटक असणारा तारा निखळला असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री शिंदे यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात आदिक यांचा ठसा होता. कृषक, कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवले. नगर जिल्हा क्रांतिकारक आहे. जो तो आपला गड सांभाळण्यात अडकलेला असतांना त्यांनी आपला मतदारसंघ सोडून वैजापूर मतदारसंघातून विजय संपादन केला होता. याचा जिल्ह्यातील राजकारण्यांनी बोध घ्यावा. आपल्या मतदारसंघा पलिकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवण्यास त्यांनी सांगितले. यावेळी बबनराव पाचपुते, आ. शिवाजी कर्डिले, आ. कांबळे, आ. तांबे, आ. राजळे,आ. मुरकुटे, आ. जगताप,जयंत ससाणे, अण्णासाहेब म्हस्के, प्रेमानंद रुपवते, शिवाजी नागवडे, रामनाथ वाघ, नरेंद्र घुले, डी. आर. पाटील, ॲड. अभय आगरकर, पांडुरंग अभंग, अशोक शिंगवी, वसंतराव देशमुख, दादा कळमकर,जि.प. अध्यक्षा गुंड, जिल्हा बँक अध्यक्ष गायकर, महापौर कळमकर, विनायक देशमुख, डी. एम. कांबळे आदींची भाषणे झाली. ................ विखे यांनी आदिक यांचे सुपुत्र अविनाश यांच्यापुढे गोविंदराव आदिक यांचे संघटनांचे कार्य पुढे चालवण्याचे आव्हान आहे. अविनाश हे काम समर्थपणे पेलतील, असा विश्वास व्यक्त केला.