अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:24 AM2019-09-03T05:24:40+5:302019-09-03T05:24:45+5:30

माजी आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

 The Ram temple in Ayodhya was demolished not by Babar but by Aurangzeb | अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

Next

अयोध्या : येथील राम मंदिर बाबराने नव्हे तर औरंगजेब बादशहाने उद््ध्वस्त केले, असा दावा किशोर कुणाल या माजी आयपीएस अधिकाºयाने लिहिलेल्या अयोध्या रिव्हिजिटेड या पुस्तकात करण्यात आला आहे.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. या पुस्तकातील माहिती पुरावा म्हणून न्यायालयासमोर येणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. किशोर कुणाल १९७२च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते.

बाबरी मशिदीच्या आधी त्या जागेवर राम मंदिर होते. याच जागी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता या आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ किशोर कुणाल यांनी या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील उतारे, पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननांचे अहवाल यांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माजी सरन्यायाधीश जी. बी. पटनायक यांनी म्हटले आहे की, अयोध्या वादासंदर्भात या पुस्तकामुळे नवे पैलू उजेडात आले असून, त्यांच्या समर्थनार्थ अनेक सबळ पुरावेही दिलेले आहेत. या पुस्तकात किशोर कुणाल यांनी म्हटले आहे की, राम मंदिर बाबराच्या कारकिर्दीत इ. सन १५२८मध्ये नव्हे तर औरंगजेब सत्तेवर असताना इ. सन १६६०मध्ये उद््ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबचा सरदार फेदाई खान याच्या हातात अयोध्येची सारी सूत्रे होती. त्यामुळे राम मंदिर उद््ध्वस्त करण्याचे बाबराने आदेश दिले होते असे म्हणणे साफ चुक आहे. बाबराने अयोध्येला कधीही भेट दिली नव्हती. अवध प्रांताचा प्रमुख मीर बाकी याने इ. सन १५२८मध्ये मंदिर पाडून तिथे मशिद बांधली असा दावा अयोग्य आहे. 

नवाबांचा अयोध्येच्या बैराग्यांना आश्रय
च्या पुस्तकात म्हटले आहे की, बाबरपासून शहाजहानपर्यंतचे मुघल बादशहा हे काही प्रमाणात उदारमतवादी होते. त्यांनी सर्वच धर्मांना आश्रय दिला होता. अवधच्या पहिल्या चार नवाबांनी अयोध्येच्या बैराग्यांनाही उदार आश्रय दिला होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र औरंगजेबाच्या कारकीर्दीत अयोध्येतील राम मंदिर पाडले.

Web Title:  The Ram temple in Ayodhya was demolished not by Babar but by Aurangzeb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.