अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 07:53 PM2022-10-19T19:53:58+5:302022-10-19T19:54:56+5:30

अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे.

ram temple construction 42 doors will be made maharashtra teak wood | अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

googlenewsNext

अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. मोर, कलश, सूर्य, चक्र, शंख, गदा आणि विविध फुलांचे विशेष कोरीवकाम असलेले मंदिरातील 42 दरवाजे तयार करण्यासाठी सुमारे 1,700 घनफूट लाकूड लागणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे. गर्भगृह आणि तळमजल्यावर पाच मंडपांसह तीन मजल्यांवर बांधकामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे बांधकाम ठप्प झाले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिर ट्रस्टने योजनेनुसार काम सुरू असल्याचा दावा केला आहे आणि डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांना रामलल्लाचं दर्शन घेता येईल असं सांगितलं आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत समान पातळीचे बांधकाम आणि नक्षीकाम राखण्यासाठी मंदिराच्या सर्व भागात एकाच वेळी बांधकाम केले जात असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. 6.5 मीटर (21 फूट) उंच प्लॅटफॉर्मवर ग्रॅनाइट दगडापासून मंदिराची वरची रचना बांधली जात आहे. जी सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली. प्लिंथच्या बांधकामात इंटरलॉकिंग व्यवस्थेमध्ये दोन टन वजनाचे सुमारे 17,000 ग्रॅनाइट स्टोन ब्लॉक वापरले गेले.

मंदिराची रचना राजस्थानी दगडात कोरलेली
मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार एकूण बिल्ट-अप क्षेत्र 58,920 स्क्वेअर फूट इतके आहे आणि तीन-स्तरीय संरचना पूर्ण केल्यानंतर तळमजला 72 फूट पोहोचला आहे. यासोबतच भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहारपूर येथील राजस्थानी दगड वापरून मंदिर बांधले जात असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे. बन्सी पहारपूरचा सुमारे 4.75 लाख घनफूट दगड मंदिराच्या रचनेत वापरण्यात येणार आहे. मंदिराच्या गर्भगृहातील भिंती आणि मजला संगमरवरी असेल.

मंदिरात एकूण ३९२ खांब, संगमरवरी गर्भगृहाचे बांधकाम
मंदिरात एकूण ३९२ खांब असतील, असे ट्रस्टने सांगितले. ज्यामध्ये तळमजल्यावर १६६, पहिल्या मजल्यावर १४४ आणि तिसऱ्या मजल्यावर ८२ खांब असतील. गर्भगृहात पांढरे संगमरवरी खांब बसविण्याचे कामही सुरू झाले आहे. बन्सी पहारपूर दगडी कोरीव काम आणि बांधकामासाठी राजस्थानमधील खदानी, कार्यशाळा आणि मंदिराच्या ठिकाणी कुशल तंत्रज्ञ तैनात करण्यात आले आहेत. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स (NIRM), बेंगळुरू स्थित वास्तुविशारद CB सोमपुरा आणि अंमलबजावणी करणार्‍या संस्था Larsen & Toubro Limited (L&T) आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्सद्वारे दगडांची गुणवत्ता आणि कारागिरीचे परीक्षण केले जात आहे. आत्तापर्यंत बन्सी पहारपूरचे ४२ टक्के दगड कोरलेले आहेत.

Web Title: ram temple construction 42 doors will be made maharashtra teak wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.