राम मंदिर बांधकामास गुरुपौर्णिमेनंतर वेग
By admin | Published: July 3, 2017 12:55 AM2017-07-03T00:55:58+5:302017-07-03T00:55:58+5:30
अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामाला पुढील आठवड्यातील गुरू पोर्णिमेपासून वेग येण्याची शक्यता आहे. मंदिराच्या बांधकामाची योजना
लखनौ : अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामाला पुढील आठवड्यातील गुरू पोर्णिमेपासून वेग येण्याची शक्यता आहे. मंदिराच्या बांधकामाची योजना करण्यासाठी सीतापूर येथील नरदानंद आश्रमात संत एकत्र येणार आहेत. हे संत उत्तर प्रदेश आणि त्याच्या शेजारील राज्यांतील वेगवेगळ््या आखाड्यांचे आहेत. अयोध्येतील नियोजित राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात चर्चा व विचारविनिमय संतांच्या या बैठकीत होईल, असे नरदानंद आश्रमाचे (सीतापूर) प्रमुख स्वामी विद्या चैतन्य महाराज म्हणाले.
नऊ जुलै रोजी गुरू पोर्णिमा असून त्यादिवसापासून राम मंदिराच्या बांधकामासाठी केवळ संतांचाच नव्हे तर सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळवण्याच्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी २७ जून रोजी झालेल्या भेटीचा संदर्भ देऊन महाराज म्हणाले की,‘‘२०१९ च्या आधी भव्य राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ झालेला असेल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.’’ गुरुपोर्णिमेनिमित्तचे विधी नरदानंद आश्रमात झाल्यानंतर मी विशेष रथातून राज्याच्या वेगवेगळ््या आश्रमांत तसेच शेजारच्या राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड राज्यांत जाऊन मंदिराच्या बांधकामासाठी पाठिंबा मिळवणार आहे, असे ते म्हणाले.