अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:03 PM2024-08-22T23:03:05+5:302024-08-22T23:05:55+5:30

अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिरातील प्रसाद आणि खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. रामलला यांना एका वर्षात ३६३ कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या.

Ram temple in Ayodhya received over 363 crores in donations in one year; Information at the meeting of the Trust | अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिरातील अर्पण आणि खर्चाचा हिशेब सादर करण्यात आला. रामलला यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ३६३ कोटी ३४ लाख रुपये देणग्या मिळाल्या. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला विविध माध्यमातून ही रक्कम मिळाली.परदेशात राहणाऱ्या राम भक्तांनी १० कोटी ४३ लाख रुपये अर्पण केले, तर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत बँकेत जमा केलेल्या २६०० कोटी रुपयांवर व्याज म्हणून २०४ कोटी रुपये मिळाले.

५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर रामलला यांना १३ क्विंटल चांदी आणि २० किलो सोने मिळाले आहे. 

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सर्व शिल्पकारांना प्रत्येकी ७५ लाख रुपये दिले. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर संगमरवरी बनवलेली राम दरबाराची मूर्ती बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र त्यापूर्वी ट्रस्टने राम दरबाराची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या मिश्र धातुपासून बनवण्याचा निर्णय घेतला होता. आता ही मूर्ती तयार आहे. राम दरबाराची संगमरवरी मूर्ती अचल मूर्ती म्हणून तयार केली जात आहे.

Web Title: Ram temple in Ayodhya received over 363 crores in donations in one year; Information at the meeting of the Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.