राम मंदीर नाही उभारलं, तरी गरीबाला जेवण कुठे मिळणारे? - मोहन भागवत
By admin | Published: January 28, 2016 02:13 PM2016-01-28T14:13:18+5:302016-01-28T14:13:18+5:30
राममंदीर नाही उभारलं तर गरीबांना जेवण मिळेल का? असा प्रतिप्रश्न विचारत राम मंदीर व देशातील गरीबी यांची सांगड घालू नये असा थेट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - राममंदीर नाही उभारलं तर गरीबांना जेवण मिळेल का? असा प्रतिप्रश्न विचारत राम मंदीर व देशातील गरीबी यांची सांगड घालू नये असा थेट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.
पुण्यामध्ये छात्रसंसदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. एका विद्यार्थ्याने राम मंदीर बांधले तर गरीबाला जेवण मिळेल का असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना भागवतांनी राम मंदीर नाही बांधलं तरी गरीबाला जेवण कुठे मिळणार आहे असं विचारत, गरीबी दूर करण्यासाठी देश समृद्ध करावा लागेल आणि त्यासाठी रामासारखे आदर्श ठेवून देश उभारावा लागेल असे उद्गार काढले.
राजकारण, धर्म अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, ज्यांना भागवत यांनी संस्कृत वचनांचा आधार घेत उत्तरे दिली.