"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 09:16 AM2024-06-15T09:16:14+5:302024-06-15T09:19:12+5:30
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्रासह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे."
लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता योग गुरु बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया आली आहे. "राजकीय वक्तव्य होत असतात. राम सर्वांचे आहेत, राष्ट्र सर्वांचे आहे आणि आपण सर्व एकमेकांचे आहोत. कुठल्याही जाती, पंथ अथवा विचारधारेच्या नावावर देशात भेजभाव करणे राष्ट्राचे एक्य आणि अखंडतेच्या दृष्टीने योग्य नाही," असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी हरिद्वारमधील हरी सेवा आश्रमात सुरू असलेल्या संत सम्मेलनादरम्यान माध्यमांसोबत बोलत होते.
रामदेव पुढे म्हणाले, "
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्रासह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एवढेच नाही, तर आम्हाला विश्वास आहे की आपला देश पुढे जाईल. देशासमोर कितीही आव्हानं असोत, पंतप्रधान मोदी देशाला सोबत घेऊन पुढे चालतील. अशी आम्ही अपेक्षा करतो.
काय म्हणाले होते इंद्रेश कुमार? -
जयपूर जवळील कनोता येथे आयोजित 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभादरम्यान बोलताना इंद्रेश कुमार कुणाचेही नाव न घेता म्हणाले होते, "निवडणुकीचा निकाल त्यांची वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. पक्षाने आधी भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखले. मात्र, सर्वात मोठा पक्ष बनवले. इंद्रेश कुणार यांचा रोख भाजपकडे होता. याशिवाय, ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवले," असेही ते म्हणाले. म्हणजेच I.N.D.I.A. आघाडी.
त्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू अहंकारी झाले -
इंद्रेश कुमार म्हणाले, लोकशाहीत रामराज्याचे विधान बघा, त्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू अहंकारी झाले. सर्वात मोठा पक्ष बनला, मात्र, जी मते मिळायला हवी होती ती प्रभू रामाने अहंकारामुळे रोखली. तसेच, रामचंद्रांना विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. ते सर्व मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
प्रभू रामचंद्र सर्वांना न्याय देतात -
इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो. प्रभू रामचंद्र भेदभाव करत नाही अथवा शिक्षाही करत नाहीत. राम कोणाला शोकही करवत नाहीत. ते सर्वांना न्याय देतात. ते देतात आणि देत राहतील. प्रभू राम नेहमीच न्यायी होते आणि राहतील. एवढेच नाही तर, एकीकडे त्यांनी प्रजेचे रक्षणही केले आणि दुसरीकडे रावणाचे भलेही केले, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.