थायलंडमधल्या 'रामा'चं निधन, नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

By admin | Published: October 13, 2016 09:25 PM2016-10-13T21:25:25+5:302016-10-13T21:29:31+5:30

थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं निधन झालं आहे.

Rama passed away in Thailand, mourned by Narendra Modi | थायलंडमधल्या 'रामा'चं निधन, नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

थायलंडमधल्या 'रामा'चं निधन, नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

Next
ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, त्यांना त्यांच्या लोकांमध्ये खूप मोठा सन्मान होता. माझी सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहे. थायलंडचे राजा भूमिबोल यांनी जगात सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारे सम्राट म्हणून ओळखले जातात.
थायलंडचे लोक त्यांना एका वेगळ्याच उंचीवरून पाहत असे. त्यांचं व्यक्तिमत्त्व कनवाळू वडिलांसारखं होतं. राजकारणाच्या वरचं स्थान त्यांना प्राप्त होतं. त्यांना एका देवासमान थायलंडमधलं पुजलं जायचं. 1932मध्ये थायलंडमधली राजेशाही संपवण्यात आली. 1935मध्ये भूमिबोल यांचे काका प्रजादीपोक यांनी राजाचं पद सोडलं. त्यानंतर राजाचं पद भूमिबोल यांचे मोठे बंधू आनंद यांना बहाल करण्यात आलं. त्यावेळी आनंद हे फक्त 9 वर्षांचे होते.
 
1946मध्ये राजा आनंद यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी भूमिबोल राजसिंहासनाच्या गादीवर विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी अविरतपणे जनतेची सेवा केली. भूमिबोल यांना फोटो काढणं, खेळण्याचा छंद होता. ते गाणेही लिहित असत. फ्रान्समध्ये थायलंडचे राजदूत असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर बँकॉकमध्ये नवे सम्राट म्हणून त्यांचं राज्यरोहण करण्यात आलं.   

Web Title: Rama passed away in Thailand, mourned by Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.