रमजान ईद उद्या
By admin | Published: July 6, 2016 03:11 AM2016-07-06T03:11:17+5:302016-07-06T03:11:17+5:30
पवित्र रमजान महिन्यातील रोज्यांनंतर येणारी मुस्लिम धर्मियांची ईद-उल-फित्र (रमजान ईद) गुरुवारी (दि. ७) रोजी साजरी केली जाणार आहे. देशभरात मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्याने
मुंबई : पवित्र रमजान महिन्यातील रोज्यांनंतर येणारी मुस्लिम धर्मियांची ईद-उल-फित्र (रमजान ईद) गुरुवारी (दि. ७) रोजी साजरी केली जाणार आहे. देशभरात मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्याने हिलाल कमिटीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी ईदच्या नमाजचे पठण केले जाणार आहे. मात्र रमजान ईदची राज्य सरकारची सुट्टी बुधवारी व केंद्र सरकारची गुरुवारी जाहीर झाली आहे.
रमजानचा २९ वा रोजा मंगळवारी झाला. चंद्रदर्शन झाले असते, तर बुधवारी ईद साजरी केली जाणार होती. मात्र पावसामुळे कोठेही चंद्रदर्शन झाले नाही. त्याबाबत मुंबई हिलाल कमिटीने देशातील हिलाल कमिट्यांशी संपर्क साधला. मात्र चंद्रदर्शनाची ग्वाही कुठेही मिळाली नाही. सौदी अरेबियामध्ये बुधवारी ईद साजरी केली जाणार आहे. चंद्रदर्शन न झाल्यास परंपरेनुसार सौदीच्या दुसऱ्या दिवशी भारतात ईद साजरी केली जाते. त्यामुळे हिलाल कमिटीने गुरुवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)