रमाकांत खलप नजर कैदेत

By admin | Published: January 12, 2016 02:21 AM2016-01-12T02:21:28+5:302016-01-12T02:21:28+5:30

गोवा विधानसभेच्या आवारात सोमवारी निदर्शन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना, सभापतींनी मार्शल व पोलिसांकरवी स्थानबद्ध करून

Ramakant Khalop eyes prisoner | रमाकांत खलप नजर कैदेत

रमाकांत खलप नजर कैदेत

Next

पणजी : गोवा विधानसभेच्या आवारात सोमवारी निदर्शन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना, सभापतींनी मार्शल व पोलिसांकरवी स्थानबद्ध करून विधानसभेचे कामकाज संपेपर्यंत नजरकैदेत ठेवले. मांद्रे (ता. पेडणे) येथील विकास परिषदेच्या कॉलेजला अनुदान देण्याबाबत तसेच नवीन शाखा सुरू करण्याबाबत सरकार सहकार्य करीत नसल्याच्या निषेधार्थ खलप निदर्शने करीत होते.
या कॉलेजबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर वैयक्तिक सुडाचे राजकारण करीत आहेत. कला आणि वाणिज्य शाखेची मागणी पूर्ण केली जात नाही, तसेच अनुदानही दिले जात नाही. दोन कॉलेजमधील अंतराचा मुद्दा उपस्थित करून या कॉलेजवर अन्याय केला जात असल्याचा खलप यांचा आरोप आहे.
निषेध म्हणून हातात फलक घेऊन ते विधानसभेच्या आवारात दाखल झाले असता, सभापतींच्या आदेशावरून त्यांच्याकडील फलक जप्त करण्यात आला. खलप पत्रकार कक्षात आल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तेथे त्यांनी जमिनीवरच ठाण मांडून सरकारचा निषेध केला. तसेच न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्सेकर हुकूमशहासारखे वागत असून गरज पडल्यास हा विषय आपण दिल्लीपर्यंत नेईन, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ramakant Khalop eyes prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.