चित्रविचित्र क्रमांकांच्या दुचाकींवर कारवाई रामानंद नगर पोलिसांची कारवाई : मद्यपी व भरधाव वेगाने चालविणार्यांवरही दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 12:16 AM2016-01-31T00:16:17+5:302016-01-31T00:16:17+5:30
जळगाव: रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहने चालविणे, दारू पिऊन दुचाकी चालविणे तसेच चित्रविचित्र क्रमांक आदी प्रकारच्या दुचाकीस्वारांवर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री काव्यरत्नावली चौकात कारवाई केली. अचानक कारवाईची मोहीम राबविल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी व शरद पाटील आदींनी रात्री एक वाजेपर्यंत ही मोहीम राबविली. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाचीही मदत घेण्यात आली.
Next
ज गाव: रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहने चालविणे, दारू पिऊन दुचाकी चालविणे तसेच चित्रविचित्र क्रमांक आदी प्रकारच्या दुचाकीस्वारांवर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री काव्यरत्नावली चौकात कारवाई केली. अचानक कारवाईची मोहीम राबविल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी व शरद पाटील आदींनी रात्री एक वाजेपर्यंत ही मोहीम राबविली. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाचीही मदत घेण्यात आली.यांच्यावर केली कारवाईदारू पिऊन दुचाकी चालविणार्या घनश्याम दत्तात्रय सोनार (क्र.एम.एच.१९ सी.बी.०२५०) व आशीषकुमार प्रीतमसिंग (एम.एच.१९.सी.बी.०६२०) या दोघांवर मोटार वाहन कायद्यान्वये दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. परिवहन नियमांचे उल्लंघन करणार्या पंकज चंदुलाल केंगरानी (क्र.एम.एच.१९ ए.व्ही.००११), योगेश राजीव भावसार (क्र.एम.एच.१९ जी.डी.३८९) व गोरख मेहता (क्र.एम.एच.१९ सी.के.२२४७) यांना प्रत्येकी तीनशे रुपये दंड ठोठावण्यात आला. तर पियूष अभय पाटील या तरुणाच्या दुचाकीला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शनिवारी दंड भरून त्या सोडण्यात आल्या.कारवाई सुरूच राहणारसोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये महागड्या दुचाकींचाच वापर झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दुचाकीधारकांवर कारवाईची मोहीम उघडण्यात आली असून त्यात सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वाडीले यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी वाहतूक शाखा व रामानंद नगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.